शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील पाषाणाला पान्हा फुटता फुटेना!, कामात मोठा अडथळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:48 IST

कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाची लगीनघाई सुरू झाली आहे. मात्र, घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे. परंतु, अतिशय कठीण असलेले हे कातळ फुटता फुटत नसल्याने तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे.गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले होते. सध्या घाटात दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे.काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिरणी - लोटे या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भराव करून काॅंक्रीटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने भरावाचे काम सुरू आहे. घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळ दोन ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्याचेही काम सुरू आहे. कातळ फोडण्यासाठी सुरूंग लावण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु,  घाटमाथ्यावर लोकवस्ती असल्याने त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी आलेल्या वेगाला कातळाने ब्रेक लावला आहे.

परशुराम घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळ अतिशय कठीण स्वरूपाचा आहे. ब्रेकरनेही तुटता तुटेना, अशी परिस्थिती आहे. तूर्तास पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने बाजूचा मऊ खडक तोडून कातळाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्थितीत बायपास रस्ता तयार केला जात आहे. बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरू झाली की, कातळ फोडण्याचे काम केले जाणार आहे.  - शिवाजी कांबळे, अभियंता, कल्याण टोलेवेज कंपनी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग