शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुंभार्ली घाटातील रस्ता खचला!, मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 16:30 IST

पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत अवघड असणारा कुंभार्ली घाट महत्वाचा

चिपळूण : कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याठिकाणी बॅरल उभारून वरवरची उपाययोजना केली असली तरी धोका कायम आहे. याविषयी मनसेचे वाहतुकसेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दखल घेत दगडाने भरलेले बॅलर, झेंडे,आणि पट्टे लावून सावधानतेने प्रवास करण्याचे सूचित केले आहे. या रस्त्यावर कोट्यवधीचा निधी खर्च घालणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त ठिकाणी दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकामाला लवकरच जोरदार दणका देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जुना विजापूर रस्ता म्हणून ओळख असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत अवघड असणारा कुंभार्ली घाट राज्यातील महत्वाच्या घाटामध्ये नोंदला गेला आहे. या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असतो. मात्र तरीही घाटातील रस्ता सुस्थितीत टिकत नाही. अतिशय अवघड वळणाचा असलेल्या कुंभार्ली घाटात तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. कित्येक दिवस खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. केवळ रिकामे बॅलर उभारून ठेवल्याने वाहतूकदारांसाठी ते तितकेच असुरक्षित ठरत आहे.याबाबत प्रवाशी आणि वाहनधारकांच्या तक्रारी लक्षात घेत मनसेचे वाहतूकसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि पदाधिकारी यांनी जाऊन घाटातील रस्त्याची पाहणी केली. धक्कादायक वास्तव्य समोर आल्यानंतर तात्काळ वाहतूक संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, खेर्डी शाखाध्यक्ष प्रशांत हटकर, संजय वाजे, आशिष गजमल, विकास म्हादम, कल्पेश म्हादम, नरेंद्र म्हादम, चम्या म्हादम, आदित्य तंबीटकर, निरंजय म्हादम, प्रतीक आंग्रे आदींनी दगडाने भरलेले बॉलर, मनसेचे झेंडे मनसेचा पट्टा लावून धोकादायक ठिकाणी वाहनचालकांना सावधानतेने गाडी चालवण्याचे सूचित केले आहे. या संदर्भात वाहतूकसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाटावर होणार खर्च, अनावश्यक बांधलेल्या भिंती आणि गरज आहे त्या ठिकाणी न घेतली काळजी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एप्रिल, मे पासून ही परिस्थिती असताना उपाययोजना का केली नाही, असा सवाल करून सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे उत्तर द्यावेच लागेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे