शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हलवणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:37 IST

रत्नागिरी : क्रिटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याचे दालन सुरु होत आहे. घराघरांत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी ‘ हॉस्पिटल ऑन व्हील’ ...

रत्नागिरी : क्रिटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याचे दालन सुरु होत आहे. घराघरांत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू करणार आहे, असे आश्वासन देतानाच प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉ. रामानंद जयप्रकाश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संघमित्रा फुले, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले की, आरोग्याच्या सुविधा निर्माण करताना चांगल्या इमारती हव्यात. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सीसीयूमुळे मदत होणार आहे.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस हॉस्पिटलरत्नागिरीमध्ये सुरू आहे. लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना जिल्ह्यात आणणार असून, त्या माध्यमातून घराघरांत आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या जातील. डॉक्टरांनी रुग्णांवर हसत हसत उपचार केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रशियन महिलेच्या मानसिकतेवर उपचार करण्यात आले. घरच्यांपेक्षाही चांगले उपचार इथे आल्यावर रुग्णांवर होतात. तसेच त्या महिलेवरही करुन तिला तिच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. एकाअर्थाने हे प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याबद्दल डॉ. फुले यांना धन्यवाद देतो, असे सांगून हे प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातच राहणार असून, ते कोणत्याही जिल्ह्यात स्थलांतरित होणार नाही, अशी ग्वाही दिली.

स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीशासकीय कार्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालये त्याचा परिसर, विशेषत: शौचालये, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असेही मंत्री सामंत म्हणाले. २४ कोटी रुपये खर्चून क्रिटिकल केअर युनिट सुरु करणार.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतhospitalहॉस्पिटल