शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर जातो असे सांगून घरातून अल्पवयीन मुलगा बाहेर पडला, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:12 IST

तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाली पण..

रत्नागिरी : बाहेर जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या रत्नागिरी शहरातील अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राशी संपर्क ठेवला हाेता. त्याआधारे त्या मित्राकडे चाैकशी करत पाेलिसांनी अवघ्या पाच दिवसात पंढरपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात २४ जुलै रोजी शहर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलाच्या नातेवाइकांनी मुलाला पळवून नेल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तत्काळ मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या टीमने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले व शहर पोलीस स्थानकात आणले.या मुलाकडे मोबाइल असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याने काही काळ माेबाइल बंद ठेवल्याने त्याचा शाेध लागत नव्हता. मात्र, काही काळ मोबाइल सुरू करून तो वारंवार एकाच नंबरला काॅल करत असल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. पाेलिसांनी त्या नंबरचा सीडीआर तपासला.त्यानंतर त्याने संपर्क साधलेल्या त्याच्या मित्राशी पाेलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर ताे पळून गेलेला मुलगा पंढरपुरात असल्याचे समाेर आले आणि पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासाेबत एक अल्पवयीन मुलगीही असल्याचे समाेर आले. तिलाही पाेलिसांनी त्याच्यासाेबत ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस