शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात गवा रेड्याने रोखला महामार्ग, वाहनचालकांना भरली धडकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:38 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील शहरालगतच्या कापसाळ येथे रविवारी मध्यरात्रीनंतर गवा रेड्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. महामार्गावरच काही वेळ तो थांबल्याने ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील शहरालगतच्या कापसाळ येथे रविवारी मध्यरात्रीनंतर गवा रेड्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. महामार्गावरच काही वेळ तो थांबल्याने वाहनचालकांमध्ये धडकी भरली होती. तर स्थानिक नागरिकही घाबरून गेले. महामार्गावर प्रथमच गवा रेड्याचे दर्शन झाले.चिपळूण शहराला चारही बाजूने जंगलमय डोंगराने वेढले आहे. तीस टक्के डोंगर भागात उतारावर नागरी वस्ती आहे. त्यामागे जंगल परिसर आहे. शहर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अनेक वेळा निदर्शनास आला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी शहरातील उक्ताड परिसरात जंगलमय असलेल्या डोंगर उतारावरील एका बंद घरामध्ये बिबट्याने शिरकाव केला होता. सहा ते सात वर्षांपूर्वी एक गवा रेडा थेट शहरातून मार्गक्रमण करीत रामतीर्थ स्मशानभूमी मार्गे मुरादपूर, शंकरवाडीदरम्यान निदर्शनास आला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने काही घरांच्या प्रवेशद्वारांची मोडतोड करून गांधारेश्वर नदी परिसरातून महामार्गावर नजीकच्या जंगलमय परिसरात गेल्याचे सांगितले.

शहरातील विंध्यवासिनी देवी मंदिर परिसरातील जंगलात एक बिबट्याची मादी पाच बछड्यांसह आढळली होती. वन विभागाने काही काळ सीसीटीव्ही लावून माणसांचा वावर बंद केला होता. तर लोकवस्तीत मगरींचाही वावर वाढल्याच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत. आता तर थेट महामार्गावरच एक भला मोठा गवा रेडा कामथे, कापसाळच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास वावरताना निदर्शनास आला. काही काळ या गवा रेड्याने वाहनचालकांच्या मनात धडकी भरवली. महामार्ग ओलांडून महामार्गावरील बॅरिकेटस्वरून उडी मारून नजीकच्या जंगलात हा रेडा निघून गेला. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून हाते आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणhighwayमहामार्गforest departmentवनविभाग