शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:57 IST

एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.

खेड : तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे धरणातीलपाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले.मिळालेल्या माहितीनुसार, या धरणाचे दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते आणि अज्ञाताने धरणाचे दरवाजे अर्धवट उघडले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुणाल ढेरे यांनी दिली आहे.तळवट धरणाच्या बांधकामाची सुरुवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. धरणाची २०१० मध्ये घळभरणी झाल्यानंतर त्यामध्ये आता ४.५४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ०.५३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वक्र दरवाजे अज्ञाताने उघडल्यामुळे वाहून गेले आहे.या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून, लवकरच धरणाचे दरवाजे बंद केले जातील, असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे; मात्र धरणासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे  स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस या धरणाच्या काही सामानाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी