शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: टँकरमधून गॅस चोरणाऱ्या फरार चालकाला ठोकल्या बेड्या, आणखी साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता 

By अरुण आडिवरेकर | Updated: March 19, 2024 16:14 IST

रत्नागिरी : टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅसचोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

रत्नागिरी : टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅसचोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद निषाद खान (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून, त्याला रायगड येथे काल, सोमवारी (दि.१८) अटक केली. त्याच्याकडून आणखी काही साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.याबाबत शुभांक विजेंद्रपाल सिंग (३८) यांनी फिर्याद दिली होती. गल्फ कंट्रीज कंपनीचा टँकर (एमपी ३७, जीए १७८५) जयगड येथे १७.७५ टन गॅस भरून १९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता खोपोली (जि. रायगड)कडे निघाला. हा टॅंकर २० राेजी खोपोली येथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु, तो तेथे पोहोचला नाही. कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी शमशाद खान याला मोबाइलवर फाेन केला असता तो बंद होता. त्यांनी टँकरच्या जीपीएसची पाहणी केली असता ताे माभळे (ता. संगमेश्वर) येथे ११ तास थांबल्याचे दिसले.त्यानंतर दिनांक २० रोजी दुपारी १:२७ वाजता चिपळूण येथे शेवटचे लोकेशन दिसले. मात्र, त्या लाेकेशनवर टॅंकर नव्हता. अन्य चालकांकडे चाैकशी केल्यावर टॅंकर पनवेलला गेल्याचे सांगण्यात आले.सुरेंद्र दिवेदी यांनी २४ राेजी पनवेल येथे जाऊन हा टँकर ताब्यात घेतला. त्या टँकरचे वजन केले असता एकूण वजन २३.३६० टन भरले. टँकरचे गॅससह एकूण वजन ३४.८६ टन भरणे आवश्यक होते. परंतु, त्यामध्ये ११.५०० टन वजनाचा गॅस कमी हाेता. या टॅंकरमधील ११.५ टन गॅसची चाेरी झाल्याचे लक्षात आले.पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, उपनिरीक्षक नागरगोजे यांनी पोलिस सचिन कामेरकर, सी. टी. कांबळे, विनय मनवल यांचे पथक तपासासाठी तयार केले. या पथकाने शमशाद खान याला रायगड येथील एका स्टील कंपनीतून अटक केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस