वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दिले 'इतक्या' प्राण्यांना जीवदान

By संदीप बांद्रे | Updated: December 18, 2024 17:43 IST2024-12-18T17:43:05+5:302024-12-18T17:43:25+5:30

संदीप बांद्रे चिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ...

The forest department also started using sophisticated systems for the rescue of wildlife animals, As many as 914 animals lives were saved in Ratnagiri district in 3 years | वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दिले 'इतक्या' प्राण्यांना जीवदान

वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दिले 'इतक्या' प्राण्यांना जीवदान

संदीप बांद्रे

चिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ही यंत्रणा वेळ न घालवता तितक्याच तत्परतेने घटनास्थळी पोहोचते आणि मुक्या प्राण्यांचा जीव वाचवते. गेल्या ३ वर्षात तब्बल ९१४ प्राण्यांचा जीव वाचवला गेला, तर ५६ प्राण्यांना जीव मुकावा लागला. आजही वन विभागाची यंत्रणा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करताना बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही सुरू केला आहे.

जंगलात पाणवठे कमी प्रमाणात असल्याने बऱ्याचदा हे प्राणी पायथ्यालगतच्या गावात येत असतात. त्यातून काही प्राणी भक्ष्य पकडताना विहिरीत किंवा खोल खड्ड्यात अडकण्याचे प्रकार नियमित घडतात. विशेषतः विहिरीत बिबट्या, डुक्कर, रानगवा, सांबर, माकड, मगर असे प्राणी अडकल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात.

२०२१-२२ मध्ये २३५ मुक्या प्राण्यांना जीवदान देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले, तसेच २०२३ मध्ये ४०८ आणि २०२४ मध्ये २७१, असे एकूण ९१४ प्राण्यांचे जीव ३ वर्षांत वाचवण्यात आले. यामध्ये ७२ पाळीव प्राणी, साप व पक्ष्यांचे जीवही वाचवण्यात यश आले.

पक्ष्यांच्या अधिवासावर कुऱ्हाडीचे घाव

  • बऱ्याचदा सह्याद्रीच्या खोऱ्यातील काही गावांत जंगलतोडीचे प्रकार घडत असल्याने त्याठिकाणी असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे.
  • वृक्षतोडीमध्ये मोठ्या झाडांची निवड केली जात असल्याने त्यावर असलेल्या घरट्यांचे नुकसान होत आहे.
     

शहर डोंगर कपारीला भिडले

  • सध्या जिल्ह्यातील विविध शहरांत सपाटीचे क्षेत्र अपुरे पडू लागल्याने डोंगर उतारावरील जमिनी विकसित होऊ लागल्या आहेत.
  • डोंगर उतारावर असलेल्या झाडाझुडपांसह वृक्षांचीही तोड होत असल्याने त्याचा फटका प्राण्यांनाही बसत आहे.
     

काट्याकुपाट्यात का अडकतात पक्षी

  • अनेक ठिकाणी पक्ष्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी जाळ्यांची रचना केली जाते. मात्र, त्यामध्ये अडकून पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडतात.
  • बऱ्याचदा शेताला तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला जातो. यामध्येही मुक्या प्राण्यांसह पक्ष्यांना जीव गमवावा लागतो.
     

तारेसह प्लास्टिकचा गळ्याला फास

  • गेल्या काही वर्षांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने ते प्राण्यांच्या पायात अडकून जखमी होतात.
  • प्लास्टिकसोबतच तारा पक्ष्यांच्या पायात अडकून ते घायाळ झाल्याचे प्रकार घडतात.
     

मध्यरात्री कॉल विहिरीत बिबट्या पडलाय

  • ग्रामीण भागातील अनेक विहिरी उघड्या असल्याने बिबट्या किंवा अन्य प्राणी भक्ष्य पकडण्याचा नादात विहिरीत पडतात.
  • अनेकदा रात्रीच्या वेळी या घटना घडत असल्याने मध्यरात्रीही वन विभागाला यंत्रणा घेऊन तेथे पोहोचावे लागते.
     

तीन तास धडपड..जाळ्यात बिबट्याला पकडले

  • विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते.
  • काही वेळा तीन तासांची धडपड केल्यानंतर बिबट्या किंवा अन्य प्राणी विहिरी बाहेर काढले जातात.

मुक्या वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आल्यानंतर त्यांना तितक्याच तातडीने मदत द्यावी लागते. रात्री-अपरात्री केव्हाही फोन येतो. त्यामुळे संबंधित यंत्रणा नेहमी तयार ठेवली जाते. आता बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्याने त्याचा चांगला उपयोग होत आहे. अशी घटना घडल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १९२६ वर फोन करतात किंवा वैयक्तिक स्वरूपात संपर्क साधतात. - गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

Web Title: The forest department also started using sophisticated systems for the rescue of wildlife animals, As many as 914 animals lives were saved in Ratnagiri district in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.