शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सवतसडा धबधब्याजवळ आढळला तरूणीचा मृतदेह, घातपाताचा संशय 

By संदीप बांद्रे | Updated: December 4, 2023 18:25 IST

दरम्यान उशिरापर्यंत मृत तरूणीची ओळख पटली नाही

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुरामनजीक असलेल्या सवतसडा धबधब्याजवळ एका २२ वर्षीय तरूणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याने निर्माण झालेल्या खड्‌ड्यात हा मृतदेह अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.सध्या सवतसडा धबधब्याची पाणी पातळी पूर्णपणे घटली आहे. त्यामुळे सवतसडा धबधब्याच्या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. अशातच सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास परिसरातील चौपदरीकरणातील एक कामगार धबधब्यावर पाणी आणायला गेला होता. तेव्हा तेथे त्याला धबधब्याच्या पायथ्याला असलेल्या खडड्यात उलट्या अवस्थेत पडलेला तरूणीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ त्याने ही माहिती पेढे येथील ग्रामस्थांना दिली. यानंतर येथील ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांना माहिती देऊन तत्काळ चिपळूण पोलिसांना कळविण्यात आले. सायंकाळच्या  सुमारास चिपळूण पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सवतसडा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी धबधबा ओसंडून वाहू लागल्यानंतर महामार्गावरून जाणारे तसेच परिसरातील अनेक पर्यटक या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यास येत असतात. याच धबधब्याच्या ठिकाणी हा तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने पेढे, परशुराम परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान उशिरापर्यंत या तरूणीची ओळख पटलेली नाही. या तरूणीच्या हाता-पायावर जखमा असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. धबधब्याचे पाणी कोसळणाऱ्या खड्‌ड्यात या तरूणीला अक्षरश: कोंबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तरूणीचे पाय वरच्या स्थितीत असल्याने ती संबंधित कामगाराला दिसून आली. या प्रकरणी चिपळूण पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस