शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सवतसडा धबधब्यात सापडलेला 'तो' मृतदेह परशुराम गावातील महिलेचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:15 IST

आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह चैतन्या चंद्रकांत मेटकर (३४) या महिलेचा आहे. धबधब्यात पाणी नसताना आणि मृतदेह ज्या परिस्थितीत आढळला ते पाहता ही आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.परशुराम घाटाजवळ असलेल्या सवतसडा धबधबा या ठिकाणी असलेल्या दगडाच्या रांजणात खडकात अडकेलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह सापडला. सुरुवातीला या महिलेचे नाव कळत नसल्याने हा मृतदेह कोणाचा? ही महिला कोण? हा सगळा प्रकार काय आहे? याबाबत तपास सुरू हाेता.चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे नाव आणि अन्य प्राथमिक माहिती मिळवली आहे. ही महिला नातेवाइकाकडे जाते, असे सांगून घरातून निघाल्याची चर्चा सुरू हाेती. सोमवारी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली.ही महिला परशुराम येथील पायरवाडीत राहणारी आहे. या महिलेचा पती मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे. या महिलेला एक लहान मुलगा असून ती गावी आपले सासरे, दीर, जाऊ आणि दिराची दोन मुले यांच्या साेबत राहत होती. ही महिला घरातून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली होती का? ही महिला त्या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणासाठी गेली? किंवा तिने स्वतःहून काही जिवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न केला का, याचा शाेध पाेलिस घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी