शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बिकट घाट; परशुराम घाटातील खचलेले काँक्रिटीकरण ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:49 IST

संदीप बांद्रे चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या ...

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, याच घाटात अनेक ठिकाणी चौपदरीकरणांतर्गत केलेला काॅंक्रीटचा रस्ता खचला असून, काही ठिकाणी तडेही गेले आहेत. या धाेकादायक रस्त्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास घाटातील धाेका वाढण्याची भीती आहे.

परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील धोकादायक असलेल्या ठिकाणी काॅंक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे.खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारली जात आहे. त्यासाठी पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबुतीकरण केले जात आहे. या कामासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. याच पद्धतीने दरडीच्या बाजूने ८ ड्रीलच्या साहाय्याने लोखंडी रॉड खडकामध्ये बसवून त्यावर जाळी टाकण्याचे काम सुरू केले आहे. एकीकडे ही दोन्ही कामे सुरू असताना खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.

खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या ठिकाणी वेळीच उपाययोजना न झाल्यास त्याखालील गॅबियन वॉलवर पुन्हा ताण येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खचलेल्या काॅंक्रिटीकरणावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

परशुराम घाटातील खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच दरड कोसळू नये यासाठी लोखंडी जाळी बसवली जात आहे. ही दोन्ही कामे मार्गी लागल्यावर खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. - पंकज गोसावी, राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग विभाग.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग