शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Ratnagiri: विहिरीच्या तळाशी सापडलेल्या लाकडाचे कुतूहल, ब्रिटिशकालीन राजापूरच्या इतिहास उलगडण्यास मदत होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:53 IST

- विनोद पवार राजापूर : राजापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला एक सुंदर तालुका. या तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदी काठावरील ...

- विनोद पवारराजापूर : राजापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला एक सुंदर तालुका. या तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदी काठावरील कुंभार मळ्यामध्ये एका शेतातील विहिरीत गाळ उपशाचे काम सुरू हाेते. हे काम सुरू असतानाच विहिरीच्या तळाशी सुमारे पंधरा-वीस फूट अंतरावर गाळामध्ये रुतलेले ३६ इंची गोलाईचे सुके लाकूड आढळले. प्रथमदर्शनी हे लाकूड या ठिकाणी नेमके कसे आणि कुठून आले, याचे कुतूहल आहे. त्याबाबत विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पूर्वीच्या काळी बोटी, होड्या बनविण्यासाठी भेंडीच्या झाडाच्या लाकडांचा उपयोग केला जात हाेता. त्या काळामध्ये होडी वा बोट तयार करण्यासाठी आणलेल्या भेंडीच्या झाडाच्या लाकडाच्या ओंडक्यांपैकी हा ओंडका असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अर्जुना नदीच्या काठावरील कुंभार मळ्यामध्ये रानडे कुटुंबीयांची अनेक वर्षांपूर्वीची विहीर आहे. या विहिरीतील गाळ उपसा करण्याचे गेल्या चौदा दिवसांपासून काम सुरू आहे. हा गाळ उपसा करताना सुमारे पंधरा-वीस फूट अंतरावर सुरुवातीला लागलेल्या काळ्या मातीच्या थराखाली टणक असलेले सुके लाकूड आढळले. मातीच्या थराखाली अचानक मोठ्या जाडीचे आणि सुमारे २० फूट लांबीचे लाकूड आढळल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही माहिती पसरताच अनेकांची पावले लाकडाचा ओंडका पाहण्यासाठी विहिरीकडे वळली.

पूर्वीच्या काळी बोट, होड्या वा जहाज बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेंडीची मोठ्या प्रमाणात झाडे पूर्वीच्या गाडीतळ भागामध्ये असल्याची माहिती काही ज्येष्ठ ग्रामस्थांकडून दिली जात आहे. त्यामुळे रानडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये सापडलेले लाकूड भेंडीच्या झाडाचे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी काहींकडून विहिरीमध्ये सापलेल्या लाकडाचा टणकपणा, रंग आणि टिकण्याची क्षमता पाहता, ते सिसम झाडाचे लाकूड असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ब्रिटिश काळामध्ये राजापूर बंदरामध्ये मोठमोठी गलबते-जहाजे येत होती. काळानुरूप नदीपात्राचा भाग गाळाने भरला आहे. त्यामुळे त्या काळामध्ये नदीपात्राची खोली नेमकी खोली किती होती, याचा अंदाज येत नाही. मात्र, विहिरीमध्ये सापडलेला ओंडका ब्रिटिश काळामध्ये नदीपात्राची नेमकी खोली किती होती, यावर प्रकाशझोत पडण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्याचवेळी ब्रिटिशकालीन राजापूरच्या इतिहासाची पानेही उलगडण्यास मदत होणार आहे.कुंभार मळा परिसरामध्ये विविध शेतकऱ्यांच्या आठ-नऊ विहिरी आहेत. तर लगतच्या पाटील मळ्यामध्येही एक विहीर आहे. रानडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये जितक्या अंतरावर काळ्या मातीचा थर लागला, तेवढ्या अंतरावर अन्य विहिरींमध्ये काळ्या मातीचा थर यापूर्वी लागलेला नसल्याची माहिती राजू रानडे यांनी दिली.रानडे यांच्या विहिरीमध्ये ज्या अंतरावर काळ्या मातीचा थर लागला, त्या अंतरावर अन्य विहिरींमध्ये नदीपात्राच्या तळाशी लागणारा रेवट्यासारखा भाग यापूर्वी आढळल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भूगोल अभ्यासक प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीमध्ये सापडलेले लाकूड आणि मातीचे नमुने आनंद मराठे यांनी योग्य पद्धतीने संकलित केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याच्यावर होणाऱ्या संशोधनातून हे झाड नेमके कशाचे आहे, नदीपात्राची खोली ब्रिटिश काळामध्ये नेमकी किती होती, यावर प्रकाशझोत पडण्यास उपयुक्त ठरणार आहे. -धनंजय मराठे, इतिहास अभ्यासक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी