शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

350th Shivrajyabhishek Sohala 2023: शिवरायांसमोर रत्नागिरीकर नतमस्तक

By अरुण आडिवरेकर | Updated: June 2, 2023 16:12 IST

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे साेहळ्याचे आयाेजन

रत्नागिरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘हर हर महादेव’ असा जयघाेष करत ढाेल-ताशांच्या गजरात रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे शिवराज्याभिषेक साेहळा पार पडला. शिवराज्याभिषेक साेहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या या साेहळ्याचे समस्त रत्नागिरीकर शुक्रवारी (२ जून) साक्षीदार बनले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक साेहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे शिवराज्याभिषेक साेहळा पार पडला. रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. भगवे झेंडे, भगव्या टाेप्या परिधान करून रत्नागिरीतील शिवप्रेमी सकाळी ७ वाजता या साेहळ्यासाठी उपस्थित राहिले हाेते. सकाळी टेंब्ये येथील रुपेश पांचाळ व जान्हवी पांचाळ या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवरायांची आरती म्हणण्यात आली.यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे प्रमुख राकेश नलावडे, समीर सावंत, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अमित काटे, निखिल सावंत, अक्षत सावंत, हिंदू जनजागृती समितीचे संजय जाेशी यांच्यासह रत्नागिरीकर उपस्थित हाेते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची पूजा हाेताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, हिंदू जनजागृती समितीचे संजय जाेशी यांनी मनाेगत व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShivrajyabhishekशिवराज्याभिषेक