शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एकाचा अंत्यसंस्कार होण्याआधीच आणखी चार मृतदेह समोर, चाळके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:20 IST

सचिन मोहिते देवरुख : घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाचे दु:ख झेलणाऱ्या कर्ली गावातील चाळके कुटुंबावर एका अंत्यसंस्कारापाठोपाठ आणखी चारजणांचे मृतदेह ...

सचिन मोहितेदेवरुख : घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाचे दु:ख झेलणाऱ्या कर्ली गावातील चाळके कुटुंबावर एका अंत्यसंस्कारापाठोपाठ आणखी चारजणांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. नियती या कुटुंबाबाबत इतकी निष्ठूर झाली की या कुटुंबाची लेक आणि नातू त्याचबरोबर मानलेली लेक आणि तिचा मुलगा अशा चौघांना काळाने आपल्यासोबत केले. खेड येथे सोमवारी पहाटे झालेल्या अपघाताने कर्ली गावाला चांगलाच धक्का बसला आहे.संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्धवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन चाळके यांचे रविवारी १८ राेजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा मुलगा आणि १ मुलगी तेथे आले होते. मुंबईहून त्यांची दुसरी मुलगी मिताली मोरे, जावई विवेक मोरे आणि नातू निहार मोरे हे गावी येण्यासाठी रात्रीच मुंबईहून निघाले. त्यांच्यासोबत चाळके यांची मानलेली मुलगी मेधा परमेश पराडकर, नातू सौरभ आणि जावई परमेश हेही होते. दुर्दैवाने देवरूख गाठण्याच्या काही तास आधीच खेड येथे काळाने त्यांना गाठले आणि कार दरीत काेसळून झालेल्या अपघातात मिताली, निहार, मेधा आणि सौरभ या चौघांचा मृत्यू झाला.मुळातच कुटुंबातील आधारवड असलेल्या मोहन चाळके यांच्या मृत्यूने चाळके कुटुंबाला धक्का बसला होता. त्यात त्यांच्यावरील अंत्यसंस्काराआधीच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या अपघाताची बातमी आली. कुटुंबातील एकावरील अंत्यसंस्कारापाठोपाठ इतरांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली. चाळके यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर सर्व खेडकडे रवाना झाले.

गावावर शोककळामोहन चाळके उद्धवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते होतेच, शिवाय सामाजिक कामामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. त्यांच्या मृत्यूपाठोपाठ या कुटुंबावर झालेल्या या अपघाताच्या मोठ्या आघातामुळे पूर्ण गावच हेलावले आहे.

अखेरचे दर्शन झालेच नाहीमेधा पराडकर या मोहन चाळके यांची मानलेली मुलगी आहेत. चाळके यांच्या निधनाची माहिती मिळताच त्याही आपल्या पती व मुलासमवेत अंत्यदर्शनासाठी गावी येण्यासाठी निघाल्या. अंत्यदर्शन मिळण्याआधी त्यांच्यावरच काळाने दुर्दैवी झडप घातली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू