डाॅक्टरांचे काैतुक करावे तितके थाेडेच : युयुत्सू आर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:34+5:302021-07-02T04:22:34+5:30

देवरुख : कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या डॉक्टरांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे गौरवोद्गार युयुत्सू ...

That's all there is to a doctor: Yuyutsu Arte | डाॅक्टरांचे काैतुक करावे तितके थाेडेच : युयुत्सू आर्ते

डाॅक्टरांचे काैतुक करावे तितके थाेडेच : युयुत्सू आर्ते

देवरुख : कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या डॉक्टरांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे गौरवोद्गार युयुत्सू आर्ते यांनी देवरुख येथे गुरुवारी व्यक्त केले.

डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सावरकर चौक मित्रमंडळातर्फे देवरुख ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर व कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. कोरोना महामारीने संपूर्ण जग हैराण झाले आहे. अशा महासंकटात डॉक्टर आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाशी दोन हात करत आहेत. या संकटकाळात स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता, काल-वेळ न पाहता रुग्ण सेवेत रुजू होणाऱ्या डॉक्टरांचे कार्य शब्दात न मोजण्यासारखेच आहेत, असे गौरवोद्गार आर्ते यांनी आपल्या मनोगतातून काढले.

देवरुख हे तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरातील लोकसंख्या पाहता शहरात लसीकरण मोहिमेला गती द्यावी, तसेच येथील रुग्णालयात पोस्टमार्टमची सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या विषयांवरही आर्ते यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी डॉ. संदेश पवार, डॉ. जान्हवी कांबळे, डॉ. आस्मा बेगम बैरागदार, डॉ. रुपाली नाईक आदींसह इतर कर्मचारी व कडवईतील अमोल कानाल उपस्थित होते.

---------------------

डाॅक्टर्स दिनानिमित्त देवरुख येथील सावरकर चाैक मित्रमंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: That's all there is to a doctor: Yuyutsu Arte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.