शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शिशुविहारकडे कामगारांची पाठच!

By admin | Updated: July 5, 2016 00:25 IST

कामगार कल्याण मंडळ : बालकांचा आधार ठरलेल्या केंद्रात प्रवेशच नाही...

शिरगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संचलित कामगार कल्याण केंद्र, चिपळूण येथील शिशुविहारच्या दोन वर्गांपैकी एक वर्ग या वर्षीपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली १२ वर्ष कामगार कुटुंबांसह चिपळूण परिसरातील अनेक बालकांचा आधार ठरलेल्या या केंद्रात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कामगार कल्याण निधीची कपात तसेच अंमलबजावणी मोहीम कडक स्वरुपात न राबविल्याने छोटे उद्योग, कंपन्यांमधील अल्पवेतनधारकांना मंडळाच्या लाभाची कल्पनाच नसते. जे कामगार या संज्ञेत येतात त्यांची बालके भविष्यात पहिलीचा प्रवेश डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने या केंद्रातील प्रवेश संख्या घटली आहे. गेल्या १२ वर्षात प्रतिवर्षी सरासरी ८० मुले येथे शिकतात. परंतु, एकूण प्रवेशातील ५० टक्के मुले ही कामगारांचीच हवी, असा नियम आडवा आल्याने दोन वर्ग चालवताना यातील ४० बालके ही कामगार कुटुंबातून आलेली असावीत. मात्र, या नियमाची पूर्तता होत नसल्याने येथील एकच वर्ग सुरु राहणार आहे. यामुळे गरजू बालके प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. १७५ रुपये वार्षिक फीमध्ये रोज सकस आहार, आरोग्य तपासणी, गणवेश, वार्षिक सहल याबरोबरच स्वतंत्र शिक्षिका येथील वर्गांसाठी कार्यरत असतात. मात्र, या सुविधा असूनही कामगार कुटुंबियानी या शिशुविहारकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बालमानसशास्त्राप्रमाणे ४ बाय ४ फूट जागेत एक बालक असेल तरच त्याचे अनुकरणातून शिक्षण व बौध्दिक विकास होतो. तथापि, याबाबत केवळ शासन संचलित शिशुविहार वगळता कोणीही दखल घेत नाही. हजारो रुपयांचे डोनेशन व फी देऊन बालकांना बड्या शाळेत पाठविण्याच्या पालकांच्या मानसिकतेमुळे असे शासकीय उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कामगार कल्याण मंडळ, चिपळूण केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३ हजार ५०० कामगार आहेत. मात्र, येथील शिशुविहारमध्ये कामगारांची ४० बालकेही सध्या दाखल नाहीत. कामगार कल्याण मंडळाच्या विधायक उपक्रमांकडे पाठ फिरवणारे कामगार पाल्याच्या शिष्यवृत्तीबाबतची सर्व कागदपत्रे व सोपस्कर वेळीच पूर्ण करण्यासाठी आग्रही असतात. कामगारांच्या कल्याणासाठी ५० वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळ केंद्राला कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद नसेल तर अल्पदरात चालणारे शिवण, फॅशन डिझाईन, वाचनालय, विविध प्रशिक्षण कार्यक्रम हे क्रमाक्रमाने आपोआपच बंद पडण्याचा धोका आहे. लाभार्थी उपलब्ध नसेल तर बंद होणाऱ्या उपक्रमांना नवसंजीवनी कोण देणार? कामगार कल्याण अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग तळमळीने हे उपकम बंद होऊ नयेत यासाठी विविध कंपन्यांमधून संपर्क साधत आहे. मात्र, मंडळाकडे आपुलकीने पाहण्याची कामगारांची मानसिकता व कल्याण निधीची कठोर अंमलबजावणीच कामगार कल्याण केंद्राचे अस्तित्व अबाधित ठेवू शकते. (वार्ताहर)विविध उपक्रम : जनजागृतीची गरज...कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभण्यासाठी कामगार कल्याण मंडळाने सुरुवातीपासून जनजागृती करतानाच कामगारांचा विश्वास संपादन केला तरच कामगार कल्याण मंडळाचे अल्पदरात सुरु असलेले विविध उपक्रम सुरु राहतील. अन्यथा ते बंद पडू शकतात, असे मत व्यक्त होत आहे.