तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश

By Admin | Updated: August 9, 2014 00:54 IST2014-08-09T00:52:34+5:302014-08-09T00:54:18+5:30

स्मशान शेड उद्ध्वस्त : रहिवाशांच्या ‘प्रेत मोर्चा’ च्या इशाऱ्याचा घेतला धसका

Temporary repair instructions | तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश

तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश

>शेफाली परब-पंडित - मुंबई
सणउत्सव येताच ध्वनिप्रदूषणावर वाद सुरू होतो़ लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असावा अथवा त्यावर र्निबध आणावे, यावर चर्चा रंगत़े मात्र ध्वनिप्रदूषणाचा धोका वर्षागणिक वाढतच आह़े  गेल्या काही वर्षामध्ये या प्रदूषणामुळे अचानक बहिरेपण येणा:या रुग्णांच्या संख्येत 20 ते 30 टक्के वाढ झाली आह़े
मुंबई महापालिकेच्या कान, नाक, घसा या  विशेष रुग्णालयाच्या सादरीकरणातून ही बाब उजेडात आली. या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात रोज साडेतीनशे रुग्ण येतात़ ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे अचानक बहिरेपणा आलेल्या रुग्णांच्या संख्येत 2क् ते 3क् टक्के वाढ झाल्याची कबुली या रुग्णालयाच्या प्रमुख डॉ़ दीपिका राणा यांनी दिली़
र्निबध आणण्याचा वाद
ध्वनी मर्यादा वाढल्यास लाऊडस्पीकर  ठेकेदारांवर कारवाईचा इशारा ठाणो पोलिसांनी दिला़ या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या पालिका रुग्णालयातही ही माहिती ध्वनिप्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम दर्शवत़े मात्र एका दिवसाच्या सणावर ही बंदी का, असाही युक्तिवाद सुरू आह़े 
सव्रेक्षणो काय म्हणतात?
मुंबई शहरातील दिवसा व रात्रीचा आवाजही गेल्या पाच वर्षामध्ये वाढला आह़े नियमानुसार 5क् डेसिबलर्पयत ध्वनी असू शकतो़ मात्र मुंबईत दिवसा आवाजाचे प्रमाण 63 डेसिबल तर रात्रीचे हेच प्रमाण 78 डेसिबल असल्याचे आढळून आले आह़े 
हेडफोनमुळे बहिरेपणात वाढ
 हेडफोन लावून मोठय़ा आवाजात गाणो ऐकून बहिरेपण आलेले दर आठवडय़ात दहा टक्के विद्यार्थी पालिका रुग्णालयात येत आहेत़ हे बहिरेपण उपचारानंतर दूर होत़े मात्र त्यानंतरही  हेडफोन लावून गाणी ऐकल्यास कायमचे बहिरेपण येण्याची शक्यता डॉ़ राणा यांनी व्यक्त 
केली़ (प्रतिनिधी)
 
मोठय़ा आवाजात संगीत ऐकणो, वाहनांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण व अन्य प्रकारच्या ध्वनिप्रदूषणामुळे चिडचिडेपणा, कमी ऐकू येणो, अचानक बहिरेपण येणो, रक्तदाब वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो.

Web Title: Temporary repair instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.