शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ घाटात टँकर उलटला, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक वळवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:47 IST

टँकरमधील गॅस लिक झाला नसल्याचे मोठी दुर्घटना टळली

देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळ घाटात मंगळवारी (१८ जून) टॅंकर उलटून अपघात झाला हाेता. या टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले हाेते. त्यासाठी पाली ते दाभोळे मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बावनदी-साखरपा देवरुख मार्गे वळवण्यात आली आहे. रात्री उशिरा हा मार्ग माेकळा हाेण्याची शक्यता आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दाभोळे घाटात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने गॅसवाहक टँकर (टीऐन ८८, सी ५८७३) घेऊन चालक सागर खिळे (२८ रा. कानडी, ता. आष्टी, जि. बीड) जात हाेता. दाभोळे (ता. संगमेश्वर) गावच्या हद्दीतील घाटात आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या उजव्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत काेसळला. त्यामध्ये चालक सागर खिळे किरकोळ जखमी झाल्याने उपचाराकरिता पाठवण्यात आले हाेते. अपघातानंतर जेएसडब्ल्यू कंपनीचे गॅस एक्सपर्ट नीलेश भोसले यांनी टँकरमधील गॅस लिक झालेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले हाेते. हे काम सुरू असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. मात्र, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पाली ते दाभोळे या भागावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच साखरपाकडून येणारी वाहने साखरपा देवरुख मार्गे रत्नागिरीकडे वळवण्यात आली. तर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने पालीपासून थांबवण्यात आल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी साखरपा मुर्शी तपासणी नाक्याचे पोलिस उपनिरीक्षक कदम व पोलिस कर्मचारी तसेच हातखंबा महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पाेलिस निरीक्षक विक्रमसिंह पाटील व पोलिस उपस्थित हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात