शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:43 IST

उच्च न्यायालयातील वकील ॲड. ओवेस पेचकर यांनी जनहित याचिका करून पाठपुरावा सुरू ठेवला

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांकडे मंगळवारी अर्जाद्वारे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी रुंदीकरण प्रकल्पाची कामे करत असलेल्या कंत्राटदार कंपन्यांना योग्य दिशादर्शक फलक व सुरक्षिततेचे अन्य उपाय करण्यास सांगून खबरदारी घेण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.मुंबई-गोवा महामार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-६६) रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयातील वकील ॲड. ओवेस पेचकर यांनी जनहित याचिका करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पनवेल ते झारप-पत्रादेवी या सुमारे ४५० किलाेमीटर लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचा हा प्रकल्प ११ टप्प्यांत सुरू आहे. न्यायालयाच्या मागील निर्देशांप्रमाणे एनएचएआय व पीडब्ल्यूडीने कामाचे प्रगती अहवाल मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्यासमोर सादर केले.प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी मार्ग वळवण्यात आले असताना योग्य प्रकारे दिशादर्शक फलक असण्याचा अभाव, अपुरा प्रकाश अशी विविध कारणे व त्या अपघातांमागे असल्याचे सांगत ॲड. पेचकर वर्तमानपत्रांतील काही वृत्तांचाही संदर्भ दिला. तसेच कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा केअर केंद्रेही नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वळणांच्या ठिकाणी ठळकपणे दिशादर्शक फलक असणे व सुरक्षिततेचे अन्य उपाय असणे आवश्यक आहे, असेही सांगितले. याबाबत खबरदारी घेण्याची सूचनाही खंडपीठाने सरकारला केली. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी बाजू मांडली.आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकड टप्प्यांच्या कामासाठीचे कंत्राटदार बदलण्यात आले आहेत. ३१ मेपर्यंत आरवली ते कांटे या टप्प्याचे काम ५० टक्के आणि कांटे ते वाकेड टप्प्याचे काम ६० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती काकडे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गCourtन्यायालय