शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

By संदीप बांद्रे | Updated: February 17, 2024 15:42 IST

चिपळूण :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव व भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी ...

चिपळूण :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव व भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. या जमावाने महामार्गाची कोंडी केली, शिवाय एकमेकांवर दगडफेक करत गाड्यांचीही तोडफोड केली. शांतता भंग केल्याप्रकरणी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी शनिवारी येथील पोलिस स्थानकांत केली आहे. अ‍ॅड.पेचकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, चिपळूण शहर हे राजकीय, सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या कोकणातील महत्वाचे शहर आहे. या शहराला राजकीय व सांस्कृतिक वारसा आहे. त्याला तडा देण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. अतिशय खालच्या दर्जाची गलिच्छ भाषा एकमेकांविरोधात वापरुन चिपळूण शहाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला आहे. त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना चिथावणी देवून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.शिवाय अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत महामार्गावर असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या. या राड्यातून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले. तसेच जनतेला त्रास होईल असे कृत्य करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. वाहतुकीस अडथळा निर्माण करून इतरांच्या जिवीतास धोका निर्माण केला. दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सर्वसामान्य जनतेला त्रास होणारी कृत्ये केली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 141, 142, 143, 146, 147, 149, 152, 153, 157, 160, 323, 325, 336, 427, 431, 504, 505 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची सखोल चौकशी करुन दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  चिपळूण शहराच्या वतीने तक्रार दाखल करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे Bhaskar Jadhavभास्कर जाधवPoliceपोलिसadvocateवकिल