असगोली : लसीकरणासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींना विनाशुल्क मोफत रिक्षासेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल, गुहागर शहरातील स्वयंप्रकाश गोधळे मंडळातर्फे पराग भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
दिव्यांग व्यक्तींसाठी जीवन शिक्षण शाळा येथे लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. लसीकरणाच्या वेळी गुहागर शहरातील १६ दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरापासून ते लसीकरण केंद्रापर्यंत आणून, लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले. या कार्याची दखल घेत, कोविड योद्धा म्हणून पराग भोसले यांचा स्वयंप्रकाश गाेधळे या मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायत सफाई कामगार गणेश पावस्कर व समर्थ भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे नितीन गाेयथळे, राकेश गाेयथळे, नगरसेवक व आरोग्य सभापती अमोल कोथळे, महेंद्र पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र गोयथळे, मंदार गोयथळे, तनया गोयथळे, सौरभ गोयथळे उपस्थित होते.