शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नाली सावंत खून प्रकरण: घराच्या हॉलमध्ये गणपती अन् बेडरूममध्ये केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 18:01 IST

रत्नागिरी : घराच्या हाॅलमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली होती आणि बेडरूममध्ये सुकांत सावंतने पत्नी स्वप्नालीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक ...

रत्नागिरी : घराच्या हाॅलमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली होती आणि बेडरूममध्ये सुकांत सावंतने पत्नी स्वप्नालीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात गाजणाऱ्या या खून प्रकरणातील अनेक मुद्दे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून पुढे आणले.

स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार पती सुकांत सावंत यांनी २ सप्टेंबरला दिली होती. मात्र, पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नालीची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला दिली. सुकांत सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांतने स्वतःच आपल्याला सांगितल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि तपासाला दिशा आली.

संशयित आरोपी सुकांत सावंत वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले. मात्र, पोलिसांना घराच्या जवळच थोडीशी राख आणि मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ८ ते १० मानवी अस्थी सापडल्या आणि त्यातून अनेक धागे जुळत गेले. खून घराच्या आवारातच झाल्याचे आणि मृतदेह तेथेच जाळल्याचे त्यातून निष्पन्न झाले.

मृतदेह लपवला

हा गणेशोत्सव आपल्यासाठी शेवटचा आहे, याची पुसटशी कल्पनादेखील स्वप्नालीला नव्हती. तिची हत्या करून तिचा मृतदेह गवतात लपवण्यात आला. सूर्यास्तानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. दोन साथीदारांना सोबत घेत मृतदेहाची विल्हेवाट लावली.

पेंढ्यावर मृतदेह पेटवला

या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी? याचा विचार करून शेवटी बंगल्याच्या मागील बाजूस कोबा केलेल्या भागात गवत टाकण्यात आले. या गवतावर मृतदेह ठेवून पुन्हा मृतदेहावर गवत टाकले. गवतावर पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस