स्वामी स्वरुपानंदांचा जन्मोत्सव सोहळा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 13:14 IST2021-01-10T13:14:13+5:302021-01-10T13:14:23+5:30
जगण्याची सहजसोपी शिकवण देणाऱ्या स्वामी स्वरुपानंद यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो लोक हजेरी लावतात.

स्वामी स्वरुपानंदांचा जन्मोत्सव सोहळा ऑनलाईन
पावस (रत्नागिरी) : कोरोना स्थिती लक्षात घेऊन पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंदांचा ११८ वा जन्मोत्सव सोहळा रविवारी ऑनलाईन दर्शनाने सुरू झाला आहे. दिवसभरातील कार्यक्रम भक्तांना ऑनलाईन यूट्यूब फेसबूकच्या माध्यमातून दिसणार आहेत.
जगण्याची सहजसोपी शिकवण देणाऱ्या स्वामी स्वरुपानंद यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो लोक हजेरी लावतात. 'ओम राम कृष्ण हरी' हा जप अखंड सुरू राहतो. पण यंदा कोरोनामुळे हा उत्सव अॉनलाईन पद्धतीनेच साजरा होत आहे. रविवारी त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून ते युट्युब तसेच फेसबुकवर लाईव्ह दिसणार आहेत.