शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडल्या संशयास्पद बोटी; कोकण किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:50 IST

बंदरांवर असणाऱ्या बोटींची सुद्धा तपासणी केली जात आहे

रत्नागिरी:  मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने कोकण किनारपट्टीवरती अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच चेक पोस्टवर तत्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात २० सागरी पोलीस चौकी आहेत. याठिकाणी देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक गाड्यांची कसून तपासणी  करण्याचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याच्याशिवाय विविध बंदरांवर असणाऱ्या बोटींची सुद्धा तपासणी केली जात आहे. शहरानजीकच्या पांढर्‍या समुद्र येथे तीन बोटींची पाहणी व चौकशी पोलीस दल व कस्टम विभागाकडून करण्यात येत होती.

वेंगुर्ला पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी, गाड्यांची कसून चौकशीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला पोलीस हाय अलर्ट झाले असून ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल, लॉजिंगची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. वेंगुर्ला हद्दीतील लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. स्थानिक मच्छीमार, सागर रक्षक दल सदस्य आणि वारडन यांना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल आढळून आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गPoliceपोलिस