शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी उपशिक्षक थोलबरे अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:33 IST

शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़

रत्नागिरी : शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरकाळसूर रामाणेवाडी या शाळेच्या शिक्षकाला अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबित केले़ जिल्हा परिषद शाळा कौंढर काळसूर रामाणेवाडी या शाळेतील चौथी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थिनीबरोबर दि़ १२ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपशिक्षक महादेव श्रीकृष्ण थोलबरे याने अश्लील चाळे केले होते़ यावेळी शिक्षक थोलबरे यांने त्या विद्यार्र्थिनीला शाळेतील संगणक कक्षात बोलावून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता़ या प्रकरणानंतर गुहागर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती़ या शिक्षकावर कारवाईसाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मोर्चा काढून फाशी देण्याची मागणी केली.याप्रकरणी त्या विद्यार्र्थिनीच्या आईने गुहागर पोलीस स्थानक शिक्षक थोलबरे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर पोलिसांनी थोलबरे याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणानंतर त्याने गावातून पलायनही केले होते़ या प्रकरणांतर पोलीस कारवाई करतील या भितीने अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले होते़याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली होती़ त्यावेळी थोलबरे याला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्याने अश्लील चाळे केल्यामुळे इतर विद्यार्थिनीमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़ थोलबरे याला महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४मधील भाग २ नियम ३ (१) मधील तरतूदीनुसार गैरवर्तन केल्याच्या तारखेपासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे़, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.