सूर्यकांत दळवी यांची सेनेतून हाकलपट्टी करणार : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:44 IST2019-09-13T14:42:07+5:302019-09-13T14:44:32+5:30
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सूर्यकांत दळवी यांची सेनेतून हाकलपट्टी करणार : रामदास कदम
दापोली : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
दोन दिवसांपूर्वी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम हे बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात व जादूटोणा करत असल्याचा आरोप केला आहे. आज शिवसेनेच्या दापोली तालुका कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी रामदास कदम आले असता पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, दळवी यांना रामदास कदम यांची कावीळ झाली असून, दळवींना आता सर्वत्र रामदास कदम दिसू लागले आहेत. मी विरोधी पक्ष नेता असतानाच जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाल्याची दळवी यांना माहिती नसावी. आपण जादूटोणा करत असल्याची आठवण त्यांना २०१९मध्ये झाल्याचे ते म्हणाले.
गेल्या चार वर्षात दापोली विधानसभा मतदारसंघात १ हजार २०० कोटींचा निधी आणला असून, दळवी समोर आल्यास हिशेब देऊ. एकीकडे आपल्याला शिवसेनेचा नेता म्हणायचे, तर दुसरीकडे आपल्याविरोधात प्रसारमाध्यमातून बोलायचे, हेच ते करत आहेत असे ते म्हणाले.