चिपळूण शहरातील घराघरांत होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:21+5:302021-05-05T04:51:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील नगर परिषद व जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ...

The survey will be conducted in the houses of Chiplun city | चिपळूण शहरातील घराघरांत होणार सर्वेक्षण

चिपळूण शहरातील घराघरांत होणार सर्वेक्षण

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : येथील नगर परिषद व जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केले आहे.

याविषयी मोदी यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढतो आहे. शहरात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड रुग्णालयाबाबतचे कामही सुरू आहे. लॉकडाऊन असल्याने बाजारपेठेतील गर्दीही नियंत्रित आहे. तरीही आपण सावध राहायला हवे. कोरोनाबरोबर लढण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असलो तरी शासनस्तरावरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे व शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आता ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत शहरातील सर्व प्रभागातील कुटुंबांचे वैद्यकीय सर्वेक्षण नगर परिषदेचे पथक, परिचारिका, आशा सेविका या घरोघरी जाऊन करणार आहेत तसेच कोरोनाबाबत सर्व माहिती घेणार आहेत. सर्व नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती मोदी यांनी केले आहे.

Web Title: The survey will be conducted in the houses of Chiplun city