किरण बोरकरला सर्वोच्च न्यायालयातर्फे अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:14+5:302021-09-18T04:34:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : अपना सहकारी बँक लिमिटेड या मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या खेड शाखेचे व्यवस्थापक सुधीर सागवेकर यांनी ...

किरण बोरकरला सर्वोच्च न्यायालयातर्फे अटकपूर्व जामीन मंजूर
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : अपना सहकारी बँक लिमिटेड या मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या खेड शाखेचे व्यवस्थापक सुधीर सागवेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात किरण प्रकाश बोरकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बँकेच्या कागदपत्रांत खाडाखोड करून बँकेची फसवणूक केल्याची तक्रार असून, या याप्रकरणी बोरकर याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वच न्यायालयांनी फेटाळला होता. मात्र, सर्वोच न्यायालयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे.
खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम १२० ब, ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह ३४ प्रमाणे किरण प्रकाश बोरकर (रा. बोरघर, खेड) गुन्हा नोंदविलेला होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रथम खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्जही न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर बोरकर याने दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दिनांक १५ रोजी अंतिम सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.