साखरपा बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:34+5:302021-04-11T04:30:34+5:30

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरपंच बापू शेट्ये यांनी बाजारपेठेची पाहणी केली. (छाया : संताेष पाेटफाेडे) लोकमत न्यूज ...

Sugarcane market closed tight | साखरपा बाजारपेठ कडकडीत बंद

साखरपा बाजारपेठ कडकडीत बंद

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरपंच बापू शेट्ये यांनी बाजारपेठेची पाहणी केली. (छाया : संताेष पाेटफाेडे)

लोकमत न्यूज नेटवर्क

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली होती.

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आले असून साखरपा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही शासनाच्या निर्णयाचे काटेकोर पालन केले आहे. त्याचबरोबर रिक्षाचालक-मालक संघटनेनेही आपल्या रिक्षा बंद ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन केले. शासनाने व्यापाऱ्यांच्या समस्या व जनतेच्या अडचणी समजावून घेऊन यातून तोडगा काढावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पोलीस खाते, आरोग्य खाते, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने शनिवारच्या बंदचे श्रेय असल्याचे मत सरपंच बापू शेट्ये, व्यपारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी व्यक्त केले.

Web Title: Sugarcane market closed tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.