रत्नागिरी : शहराच्या माळनाका परिसरातील एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरून बाहेर निघताना दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंपातील कर्मचारी व तेथे उपस्थितांनी दुचाकी ढकलत रस्त्यावर नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंतर दुचाकी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली. बुधवारी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.योगेश पानगले (जाकादेवी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील डिस्कवर दुचाकी घेऊन बुधवारी सकाळी ११ वाजता माळनाका येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरून झाल्यानंतर निघण्यासाठी त्यांनी दुचाकीला कीक मारली असता दुचाकीने पेट घेतला. पंपातील कर्मचाऱ्यांनी गाडी ढकलत पंपापासून दूर नेली. अग्निशमन साधनांच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती.नंतर नगर परिषद अग्नीशामकाने ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे शहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. या दुचाकीला नेमकी आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान पेट्रोलपंपावरच आगीचे हे नाट्य घडल्याने कर्मचाºयांनी तात्काळ दुचाकी बाहेर नेल्याने मोठा अनर्थ टळला.
रत्नागिरीच्या पेट्रोल पंपावर अचानक दुचाकी पेटली, तत्काळ दुचाकी बाहेर नेल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:19 IST
रत्नागिरी शहराच्या माळनाका परिसरातील एका पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरून बाहेर निघताना दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंपातील कर्मचारी व तेथे उपस्थितांनी दुचाकी ढकलत रस्त्यावर नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंतर दुचाकी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली. बुधवारी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.
रत्नागिरीच्या पेट्रोल पंपावर अचानक दुचाकी पेटली, तत्काळ दुचाकी बाहेर नेल्याने अनर्थ टळला
ठळक मुद्देरत्नागिरीच्या पेट्रोल पंपावर अचानक दुचाकी पेटलीतत्काळ दुचाकी बाहेर नेल्याने अनर्थ टळला