यज्वन पाटील याचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:29+5:302021-07-11T04:22:29+5:30

लांजा : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर ५ चा विद्यार्थी यज्वन सतीश पाटील याने एम.टी.एस. ऑलंपियाड ...

Success of Yajwan Patil | यज्वन पाटील याचे यश

यज्वन पाटील याचे यश

लांजा : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर ५ चा विद्यार्थी यज्वन सतीश पाटील याने एम.टी.एस. ऑलंपियाड या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

याबाबत माहिती देताना शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण आणि वर्गशिक्षक अमित जाधव यांनी सांगितले की, यज्वन पाटील याने यापूर्वी पहिलीमध्ये याच परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर, सलग दुसऱ्या वर्षी दुसरीमध्ये त्याने या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल, २०२१ मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत यज्वन पाटील याने १५० पैकी १४९ गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने मिळविलेल्या यशाने लांजा शाळा नंबर ५ चे नाव महाराष्ट्र राज्यात उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण व सर्व शिक्षक, तसेच शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई आणि सर्व सदस्य यांनी यज्वन पाटील याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Success of Yajwan Patil