तायक्वाॅंदो स्पर्धेत रिगल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:49+5:302021-04-06T04:29:49+5:30

फोटो कॅप्शन - जिल्हास्तरीय तायक्वाॅंदो स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी ओम पटेल याला गौरविण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोंढे ...

Success of Regal School students in Taekwondo competition | तायक्वाॅंदो स्पर्धेत रिगल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तायक्वाॅंदो स्पर्धेत रिगल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

फोटो कॅप्शन - जिल्हास्तरीय तायक्वाॅंदो स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी ओम पटेल याला गौरविण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोंढे (ता. चिपळूण) येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वाॅंदो स्पर्धेत यश संपादन केले.

साई तायक्वाॅंदो, खेड व खेड तायक्वाॅंदो स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेमध्ये २० किलो वजनी गटात दीप प्रमोद सैतवडेकर याने सुवर्णपदक, ५० किलो वजनी गटात ओम शामजी पटेल याने रौप्यपदक, तर ५५ किलो वजनी गटात श्रावणी मंगेश साळवी हिने रौप्यपदक पटकावले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक अर्जुन कलकुटकी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Success of Regal School students in Taekwondo competition