तायक्वाॅंदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:52+5:302021-03-20T04:29:52+5:30
रत्नागिरी : खेड येथे झालेल्या १४व्या रत्नागिरी जिल्हा ओपन फाईट आणि ८व्या पुमसे खुल्या तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याच्या मुलांनी ...

तायक्वाॅंदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचे यश
रत्नागिरी : खेड येथे झालेल्या १४व्या रत्नागिरी जिल्हा ओपन फाईट आणि ८व्या पुमसे खुल्या तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याच्या मुलांनी पुमसेमध्ये सांघिक तृतीय पारितोषिक मिळवत अनेक पदकांवर आपले नाव कोरले.
साई तायक्वाॅंदो स्पोर्ट्स, खेड आणि खेड तायक्वाॅंदो स्पोर्ट्स ॲकॅडमीतर्फे कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर सिनिअर आणि स्पेशल कॅटेगरी अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी विविध गटात पदकांची कमाई केली.
स्वरा विकास साखळकर, अंश प्रमोद फुखे, त्रिशा सचिन मयेकर, देवन अनिल सुपल, कृपा प्रशांत मोरये, तन्मय योगेश कवितके, गौरी अभिजीत विलणकर, आद्या अमित कवितके, सई संदेश सावंत, अमेय अमोल सावंत, सार्थक चव्हाण, आदिष्टी काळे, यज्ञा चव्हाण, पार्थ गुरव, अमेय सावंत (सिनिअर)
यांनी सुवर्ण पदक मिळवले. अनिमेश तारी, वेदांत चव्हाण, सई सावंत, मयुरी मिलिंद कदम, सानवी पराग पाटील, मोहम्मद जैद मेहबूब मालगुंडकर यांनी रौप्य पदक मिळवले. मयुरी कदम, श्रेष्ठा विलणकर, आराध्या कुलकर्णी, रुद्र करंदीकर, प्रज्योत कांबळे, समर्था बने या खेळाडूंनी कांस्य पदक मिळवले.
तसेच कॅडेट वयोगटात देवन सुपल व त्रिशा मयेकर यांना बेस्ट फायटर म्हणून सन्मानित करण्यात आले. पुमसे प्रकारात मयुरी मिलिंद कदम, स्वरा विकास साखळकर यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. रत्नागिरी तालुक्यातील सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका संघटनेचे अध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, सचिव शाहरुख शेख यांनी अभिनंदन केले. या संघाला प्रशिक्षक म्हणून अक्षय पाटील, गौरव खेडकर आणि प्रियांका चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत मकवाना, मनाली बेटकर आणि संकेता सावंत यांनी काम केले.
...................
फोटो ओळ : खेड येथे आयोजित केलेल्या तायक्वाॅंदो स्पर्धेत रत्नागिरी तालुका संघाने सांघिक तृतीय क्रमांक मिळवला.