सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 08:08 PM2021-07-13T20:08:23+5:302021-07-13T20:17:53+5:30

Stunt Case : दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे.

Stunted limbs in a river that overflows; Jumped intoxicated | सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी

सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी

Next
ठळक मुद्देदोन दिवस पडणाऱ्या  मुसळधार पावसाने दुथडी भरुन वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत त्याने दारुच्या नशेत उडी मारली.

संदीप बांद्रे

चिपळूण : पूरसदृश स्थिती असलेल्या नदीत उडी मारण्याचा स्टंट त्याच्या अंगाशी आला. दोन दिवस पडणाऱ्या  मुसळधार पावसाने दुथडी भरुन वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत त्याने दारुच्या नशेत उडी मारली. पण पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे त्याला किनारा गाठता आला नाही. बराचवेळ पोहून तो दमला आणि वाहून जाऊ लागला. मात्र त्याच्या सुदैवामुळे थोड्या अंतरावर जाऊन तो बचावला. त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.


दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत होती. त्यातच सायंकाळी भरतीचे पाणी वाढल्याने जुना बाजारपुल पाण्याखाली गेला होता, तर नवीन वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी होते. अशात एक तरुण जुन्या पुलाच्या रेलिंगवर चढला आणि हात उंचावून ओरडू लागला. त्यामुळे नवीन पुलावरून पुराचे पाणी पाहणा ऱ्या   अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.


थोड्याचवेळात त्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. उलट पोहून परत पुलापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पाण्याचा जोर वाढला असल्याने त्याला वेळ लागत होता. तो तिथपर्यंत पोहोचलाही. परंतु तेथून त्याचा हात निसटला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्यामुळे नवीन पुलावर उपस्थित असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला.


तेथून नजीकच असलेल्या नवीन पुलापर्यंत पाणी वाढले होते. त्यामुळे तो नवीन पुलाखाली गेल्यास पाण्याच्या प्रवाहात गुदमरून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला काहीजण किनाऱ्यावर येण्याचा इशारा करत होते. परंतु तोपर्यंत दमलेला हा तरुण नवीन पुलाखाली वाहून आला आणि काही क्षण गायब झाला. त्यामुळे अनेकजण घाबरले होते. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण नवीन पुलापासून काही अंतरावर तो पुन्हा दिसला. पाण्याच्या प्रवाहासाेबत वाहत वाहतच तो लांब अंतरावर किनाऱ्याला लागून बचावला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: Stunted limbs in a river that overflows; Jumped intoxicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.