महामार्गाचे काम पाहणार अभ्यासगट, कोकण हायवे समन्वय समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 03:02 PM2020-12-07T15:02:26+5:302020-12-07T15:04:47+5:30

Highway, Konkan, Ratnagirinews महामार्गाची तीन टप्प्यात विभागणी करून प्रत्येक विभागाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यास गट तयार करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर आणि पुढे खेडपर्यंत दोनशे किलोमीटर महामार्गाचा अभ्यास दौरा मंगळवार, ८ रोजी यशवंत पंडित यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला आहे.

The study group will look after the work of the highway | महामार्गाचे काम पाहणार अभ्यासगट, कोकण हायवे समन्वय समितीचा निर्णय

महामार्गाचे काम पाहणार अभ्यासगट, कोकण हायवे समन्वय समितीचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देमहामार्गाचे काम पाहणार अभ्यासगटकोकण हायवे समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत निर्णय

रत्नागिरी : महामार्गाची तीन टप्प्यात विभागणी करून प्रत्येक विभागाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यास गट तयार करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर आणि पुढे खेडपर्यंत दोनशे किलोमीटर महामार्गाचा अभ्यास दौरा मंगळवार, ८ रोजी यशवंत पंडित यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला आहे.

कोकण हायवे समन्वय समितीची पहिली बैठक संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे ऑनलाईन पार पडली. या बैठकीत कोकण हायवे समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. भविष्यात कोकण महामार्ग कसा विकसित करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कामकाजाची सद्यस्थिती पाहण्याची व अहवाल तयार करण्याची जबाबदारी संतोष मेहता, सुदेश केमनाईक यांच्याकडे तसेच या टप्प्यातील कामकाजाचे समन्वय स्वतः संजय यादवराव पाहतील तर तज्ज्ञ म्हणून यशवंत पंडित काम पाहणार आहेत.

रत्नागिरी टप्प्यात राजू आंब्रे , विकास शेट्टे, निवृत्त अधिकारी जगदीश ठोसर, श्रीनिवास दळवी, मिथिलेश देसाई हे कामाची पाहणी करतील. राजापूर ते गोवा सीमा टप्प्यातील कामाची सद्यस्थिती पाहण्याची व अहवाल तयार करण्याची जबाबदारी सतीश लळीत, समीर वाडेकर, उत्तम दळवी पाहतील. तांत्रिक समन्वयक म्हणून यशवंत पंडित, सतीश लळीत, जगदीश ठोसर, श्रीनिवास दळवी हे काम पाहतील.

पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर आणि पुढे खेडपर्यंत दोनशे किलोमीटर महामार्गाचा अभ्यास दौरा ८ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

तीन टीम करणार

महामार्गाचे काम पाहण्यासाठी दबावगट किंवा लोकचळवळ, टेक्निकल टीम आणि लिगल टीम अशा तीन टीम काम पाहणार आहेत. महामार्ग प्रश्नावर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करता यावा, याकरिता अभ्यास गट तयार करणार आहेत.

Web Title: The study group will look after the work of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.