एसटीची दुचाकीला धडक; दोन ठार

By Admin | Updated: January 13, 2017 23:10 IST2017-01-13T23:10:44+5:302017-01-13T23:10:44+5:30

मृत रायगडमधील : केळशी येथे दशक्रिया विधीसाठी येत असताना काळाचा घाला

ST's bicycle hit; Two killed | एसटीची दुचाकीला धडक; दोन ठार

एसटीची दुचाकीला धडक; दोन ठार



दापोली : दापोली-मांदिवली एसटी बसगाडीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी केळशी येथे घडली. दुचाकीस्वार जनार्दन सुर्वे (५८, दिवेआगार), चंद्रकांत महादेव शिरकर (४३, श्रीवर्धन) अशी या दोघा मृतांची नावे आहेत.
जनार्दन रामचंद्र सुर्वे हे आपल्या दुचाकीने केळशी येथील नातेवाईकाकडे दशक्रिया विधीसाठी निघाले होते. बाणकोट फेरीबोटीवर सुर्वे यांची चंद्रकांत शिरकर यांची ओळख झाली. आपण आंजर्ले येथे नातेवाईकांकडे उत्तरकार्यासाठी जात असल्याचे सुर्वे यांनी त्यांना सांगितले. ‘आपण दोघे तिकडेच जातोय तर दुचाकीवरून जाऊ या’, असे त्यांच्यात बोलणे होऊन दोघेही दुचाकीवर बसून आले. दोघे दुचाकीवर बोलत गप्पा मारत येत असताना अचानक उंबरशेत रामबाग येथे समोरून दापोली मांदिवली ही बस आली. या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून फेकले गेले. दुचाकीचालक जनार्दन सुर्वे यांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
चंद्रकांत शिरकर यांच्या डोक्याला गंभीर मार बसला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांतला दोन तासानंतर केळशी प्राथमिक केंद्रात आणण्यात आले. केळशी उपकेंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे त्यांना दापोलीत उपचारासाठी आणायला तब्बल तीन तास उशीर झाला. या दरम्यान शिरकर यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: ST's bicycle hit; Two killed