शृंगारतळी बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या निषेधार्थ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:21+5:302021-04-10T04:31:21+5:30

फोटो कॅप्शन शृंगारतळी बाजारपेठेत शुक्रवारपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : जीवनावश्यक माल विक्री करण्याव्यतिरिक्त ...

Strictly closed in protest of lockdown in Sringartali market | शृंगारतळी बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या निषेधार्थ कडकडीत बंद

शृंगारतळी बाजारपेठेत लाॅकडाऊनच्या निषेधार्थ कडकडीत बंद

फोटो कॅप्शन

शृंगारतळी बाजारपेठेत शुक्रवारपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

गुहागर : जीवनावश्यक माल विक्री करण्याव्यतिरिक्त इतर व्यापाऱ्यांनाही व्यवसाय करण्याची परवानगी द्या. आम्ही सर्व एकत्रित आहोत. आमच्याच बांधवांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत शृंगारतळी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. सोमवारपर्यंत हा बंद कायम राहणार आहे.

राज्य सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी, भाजीविक्रेते, मेडिकल आदींना व्यवसाय करण्याची परवानगी देत शनिवार व रविवारी संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा निषेध करत शृंगारतळी व्यापारी संघटनेने बैठक घेत या आदेशाला विरोध केला आहे. याबाबत तहसीलदार लता धोत्रे यांना निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या आदेशानुसार बाजारपेठेतील काही दुकाने सुरू राहतील अशावेळी कापड दुकान, चप्पल, कटलरी इतर सर्व दुकाने बंद राहिल्याने या छोट्या व्यावसायिकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येणार आहे. अशावेळी आम्ही सर्व व्यापारी व्यावसायिक शुक्रवारपासून सोमवारपर्यंत बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार शुक्रवारी शृंगारतळी बाजारपेठेत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. सोमवारपर्यंत हा बंद कायम राहणार असून मंगळवारी बाजारपेठ नियमितपणे उघडेल, असे संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांनी सांगितले.

कोट

लॉकडाऊनमुळे व्यापारी आधीच अडचणीत आला असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची मानसिकता नाही. अशा स्थितीत मोठे व्यापारी व्यवसाय करणार व छोटे व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार, हा अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकजुटीने सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- अजित बेलवलकर, अध्यक्ष, व्यापारी संघटना, शृंगारतळी.

Web Title: Strictly closed in protest of lockdown in Sringartali market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.