वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:43 IST2021-05-17T12:40:12+5:302021-05-17T12:43:25+5:30

: 'तोक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

Storm cancels six trains on Konkan railway line | वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द

वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द

ठळक मुद्दे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द 'तोक्ते' चक्रीवादळाचा धोका, कोकण किनारपट्टीवर प्रभाव

रत्नागिरी : 'तोक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवरील तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर दि. १६ व १७ रोजीच्या तिरुनेलेवली -जामनगर स्पेशल (०९५७७), वास्को द गामाकुलेम पॅसेंजर (०७३४२), वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), कुलेम - वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४४), वास्को द गामा - यशवंतपूर वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), यशवंतपूर ग वास्को द गामा वास्को द गामा-कुलेम पसेंजर (०७३३९) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी दि. १७ रोजीची ओखा - एर्नाकुलम स्पेशल गाडी (०७३४२) गुजरातमधील ओखा तसेच अहमदाबाद स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Storm cancels six trains on Konkan railway line