विजेच्या लपंडावाने हाेणारी गैरसोय थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:19+5:302021-09-22T04:35:19+5:30
लांजा : तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामीण भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमितपणे होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांची ...

विजेच्या लपंडावाने हाेणारी गैरसोय थांबवा
लांजा
: तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामीण भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमितपणे होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय तत्काळ थांबवावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती दत्तात्रय कदम यांनी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेले कित्येक महिने तालुक्यातील पूर्व विभागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती वापरात येणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड होऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, तसेच मागील काही महिन्यांत झालेल्या तौक्ते वादळ, मुसळधार पाऊस , नैसर्गिक आपत्तीमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाढीव प्रमाणात विजेची बिले आकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त हाेत आहे. यापूर्वीही नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत लेखी निवेदनाद्वारे कळविले होते. परंतु, महावितरण कार्यालय याकडे दुर्लक्ष करत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसानभरपाई देण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही व वीजपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी करण्यात आलेली दुरुस्ती, उपाययोजना याबाबत तपशीलवार माहिती मिळावी, अशी मागणी दत्ता कदम यांनी केली आहे, तसेच तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा विजेच्या या सततच्या होणाऱ्या लपंडावामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर त्याला पूर्णपणे महावितरण अधिकारी जबाबदार राहतील, असेही दत्ता कदम यांनी म्हटले आहे.