शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

रत्नागिरीत वर्षभरात पावणे दोन कोटीची चोरटी दारु जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:10 IST

आर्थिक वर्षात १४ वाहने जप्त; चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या येथील अधीक्षक कार्यालयाने सरत्या आर्थिक वर्षात मद्याच्या अवैध विक्रीवर कारवाई करत १,२७४ गुन्हे दाखल करून १ काेटी ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात १४ वाहने जप्त करण्यात आली असून, चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यारत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी अवैध मद्यविक्रीविराेधात धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. शरीराला घातक असलेल्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन जिल्ह्यात काही ठिकाणी केले जाते. हातभट्टीची दारू हानीकारक असल्याने या प्रकारच्या दारूच्या निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येते. येथील उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कार्यालयाकडून हातभट्टीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून नष्ट केली आहेत.

तसेच रत्नागिरीत नजिकच्या गोवा राज्यातून स्वस्त मिळणाऱ्या मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे इथल्या महसुलावर परिणाम होतो. त्यामुळे परराज्यातील मद्य वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही काहीजण अवैधरीत्या गोवा बनावटीचे मद्य जिल्ह्यात आणतात. त्यामुळे जिल्ह्याचा महसूल बुडतो. त्यामुळे अवैद्य मद्य वाहतुकीवर या कार्यालयाने गेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात धडक कारवाई केली आहे.या वर्षात या कार्यालयाने १२७४ गुन्हे नोंदविले. यापैकी १०४२ गुन्ह्यांचा शोध लागला, तर २३२ बेवारस गुन्हे आहेत. यात विविध प्रकारचे २९,१६२ लिटर मद्य जप्त करण्यात आले. तर परराज्यातील ३५४३.३ लिटर मद्य, असे एकूण ३२,७०६ लिटर मद्य जप्त करण्यात आले. या कारवाईत तब्बल २,८५,८५० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

  • एकूण गुन्हे : १,२७४
  • अटक आरोपी : ४
  • जप्त वाहने : १४
  • वाहनांची किंमत : ७,३०,००० रुपये
  • कारवाईत पकडलेली दारू (लिटर)
  • हातभट्टीची दारू : २८,१८९
  • देशी : ५०७.०६
  • विदेशी : ३३६.५६
  • बिअर : ८३.८५
  • ताडी : ४६
  • परराज्यातील : ३,५४३
  • रसायन जप्त : २,८५,८५०
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग