शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीच्या आधारे शोधला चोरीला गेलेला डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:42 IST

Crime News Ratnagiri police-मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजीकच्या पेट्रोलपंपातून चोरीला गेलेला डंपर ग्रामीण पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे आहे त्या स्थितीत बेळगाव येथील एका गावात सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या डंपरचा योग्य मार्ग शोधून काढला आणि डंपर हाती सापडला. विशाल पास्ते असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या या तपास पद्धतीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्हीच्या आधारे शोधला चोरीला गेलेला डंपरशेडमध्ये सापडले डंपरमधील काही साहित्य

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी नजीकच्या पेट्रोलपंपातून चोरीला गेलेला डंपर ग्रामीण पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे आहे त्या स्थितीत बेळगाव येथील एका गावात सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या डंपरचा योग्य मार्ग शोधून काढला आणि डंपर हाती सापडला. विशाल पास्ते असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांच्या या तपास पद्धतीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे शेखर म्हाप यांच्या मालकीचा डंपर (एमएच ०८, एपी ५०१५) चोरट्याने पळविला होता. सकाळी डंपर गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दिली होती. विनीत चौधरी यांनी तपासाला सुरुवात करत कोकणातील विविध पोलीस स्थानकात डंपर चोरी प्रकरणात कोणाला अटक केले आहे का याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना कणकवली पोलिसांनी विशाल पास्ते याला अटक केल्याची माहिती मिळाली होती.

कणकवली पोलिसांकडून विशालला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने डंपर चोरीची कबुली दिली आहे. मात्र, त्याने हा डंपर अन्य व्यक्तीला विकल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार तपास सुरू होता. हातखंबा-बेळगाव मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज पाहून बैलहोंगल तालुक्यातील चिक्क बागेवाडी येथे हा डंपर सापडला. मात्र, कणकवली येथून ज्या विशालने ज्याला डंपर विकला होता तो अद्यापही सापडलेला नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस कर्मचारी एस. बी. काशित, एस. बी. कांबळे, व्ही. एस. शेटकर यांनी ही कामगिरी केली आहे.हातखंबा ते बेळगाव मार्गावर तपासएकीकडे चौधरी अन्य डंपर चोरीच्या घटनांचा मागोवा घेत असताना त्यांची एक टीम मात्र हा डंपर नेमक्या कोणत्या रस्त्याने गायब झाला याच्या तपासाच्या मागे लागली होती. पोलिसांनी हातखंबा ते बेळगाव या मार्गावरील सर्व पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी उगार मिरज रोडच्या बाजूला असलेल्या एसआर कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चोरीला गेलेला डंपर उगार गावाच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून शोध घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.शेडमध्ये सापडले डंपरमधील काही साहित्यडंपरचा शोध सुरू असतानाच उगार गावाच्या परिसरात हॉटेल सृष्टीसमोर एका शेडमध्ये रेडियमचे तुकडे, टायरचे मार्क दिसून आले. यावेळी तपासात ग्रामीण पोलिसांसोबत डंपर मालकही होता. त्याने खात्री केल्यानंतर पोलिसांचा खाक्या पाहून संबंधित शेड मालकाने शेड उघडून दाखविली. त्यानंतर डंपरमधील काही साहित्य तेथे मिळाले. त्यामुळे डंपरच्या मार्गाची निश्चिती झाली होती. यावेळी डंपर बैलहोंगल तालुक्यातील चिक्क बागेवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभा असलेला डंपर ताब्यात घेण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी