तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST2021-09-16T04:39:02+5:302021-09-16T04:39:02+5:30
चिपळूण : तालुक्यातील अडरे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी श्यामकृष्ण ऊर्फ गुलाब नारायण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अडरे ...

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कदम
चिपळूण : तालुक्यातील अडरे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी श्यामकृष्ण ऊर्फ गुलाब नारायण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अडरे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून काैतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
राजापूर : तालुक्यातील आडिवरे नवेदर येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूल या प्रशालेतील १० हुशार व होतकरू मुलांना बायोस्टॅंड इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे प्रत्येक दोन हजार पाचशे प्रमाणे बायोस्टँड आस्था शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
ऑनलाईन स्पर्धा
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आठवडाभर विविध उपक्रम राबविण्याची सूचना अल्पसंख्याक व प्राैढ शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. त्यानुसार निबंध, घोषवाक्य, चित्रकला, भित्तिपत्रक स्पर्धा ऑनलाईन घेण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
ऑनलाईन राष्ट्रीय परिषद
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स काॅलेजमध्ये दि. २४ व दि. २५ सप्टेंबर रोजी ‘रिसेंट ट्रेन्डस् इन लाईफ सायन्स, एनर्जी अँड एन्व्हाॅर्मेंट’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.