शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

खेडमध्ये कदम विरुध्द कदम

By admin | Updated: November 16, 2016 22:47 IST

खेड नगर परिषद : ....तर शिवसेना विरुध्द आघाडीत चुरशीची लढत

खेड : खेड नगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकारण चर्चेचा विषय बनले आहे. याठिकाणी शहर विकास आघाडी विरुध्द शिवसेना अशीच थेट लढत अनुभवायला मिळणार आहे. मात्र, प्रथमच या निवडणुकीत खेड, दापोली, मंडणगडचे आमदार संजय कदम, मनसेचे वैभव खेडेकर आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी एकत्र येत शहर विकास आघाडीची घोषणा केल्याने या निवडणुकीला काहीसे वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. कदम विरुध्द कदम अशीच काहीशी लढत येथे पाहावयास मिळणार आहे. १९९५ ते २००५ दरम्याने झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्व उमेदवार निवडून आणले होते. तत्कालिन आमदार रामदास कदम यांची ही किमया होती. खेड तालुक्याचे आमदार झाल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. २०१०च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवानंतर मात्र त्यांचे खेडकडे लक्ष कमी झाले. त्यामुळे शहरातील सेनेचे पदाधिकारीही काहीकाळ सैरभर झाले. मात्र, याही परिस्थितीत शहराची धुरा सांभाळणारे माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, शहरप्रमुख संजय मोदी, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी, विजय चिखले, वासंती महाडिक आणि मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला सावरले. रामदास कदम आमदार झाल्यापासून आजवर कधी विकासकामात मागे राहिले नाहीत. त्यांनी शहराबरोबरच तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. शहरातील अनेक विकासकामे त्यांच्याच प्रयत्नाने मार्गी लागली आहेत. राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार असतानाही तेथील मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांनी शहर विकासासाठी निधी आणला. मात्र, २०१०च्या निवडणुकीत त्यांना मतदारसंघाच्या फेरबदलाचा फटका बसला. ते या निवडणुकीत पराभूत झाले. खेडचे विद्यमान आमदार संजय कदम, शिवसेनेचे शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे, सिकंदर जसनाईक यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यावेळी सेनेचे हे चार खंदे पदाधिकारी रामदास कदम यांच्यासोबत निष्ठेने काम करीत होते. रामदास कदम यांनीही या सर्वांना मानाची पदे देऊन त्यांच्या योगदानाचे चिज केले होते. त्यावेळचे खंदे समर्थक संजय कदम हे कालांतराने रामदास कदम यांना सोडून राष्ष्ट्रवादीत गेले. त्यानंतर ते खेड, दापोली, मंडणगडचे आमदार झाले. शशिकांत चव्हाणदेखील काहीसे नाराज आहेत. ते सेनेत असले तरी सेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत नसल्याने रामदास कदम यांचा उजवा हात समजले जाणारे चव्हाण यांची सेनेला आजही उणिव भासत आहे. सिकंदर जसनाईक हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. संजय कदम, शशिकांत चव्हाण, सिकंदर जसनाईक व शंकर कांगणे ही शिवसेनेच्या रथाची खेडमधील चार चाके होती. आमदार रामदास कदम यांची आज्ञा शिरसावंद्य मानून हे चौघेही शिलेदार सतत कार्यरत असत. यातील शंकर कांगणे आणि शशिकांत चव्हाण हे आजही सेनेत आहेत. रामदास कदम यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच मागील विधानसभा निवडणुकीत संजय कदम यांंचा विजय झाला, असे सांगण्यात येत आहे. संजय कदम आमदार झाल्यानंतर मंडणगड नगरपंचायत त्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात खेचून आणली. यावेळी सेनेच्या तीन मंत्र्यांच्या प्रचारसभा होऊनही संजय कदम यांनी हे यश मिळविले. आता त्यांनी खेड नगरपालिकेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खेड पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणे अशक्य वाटल्याने त्यांनी मनसेशी हातमिळवणी करीत शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये आता सुप्रसिध्द उद्योजक सदानंद कदम सहभागी झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शहर विकास आघाडीची सत्ता पालिकेत आणायचीच, असा चंग या त्रिमूर्तींनी बांधला आहे. आमदार संजय कदम, मनसेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी यानिमित्ताने थेट शिवसेना आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. भाजप प्रथमच या निवडणुकीत सर्व जागी लढत देत आहे. तर शिवसेना आणि आघाडीनेदेखील सर्व जागी उमेदवार उभे केल्याने अटीतटीची लढत पालिकेत पाहावयास मिळणार आहे. या निवडणुकीची सारी सूत्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेच आहेत. तरीही त्यांनी त्यांचे चिरंजीव व युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्याकडे पालिका निवडणुकीची सूत्र सोपविली आहेत. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व योगेश कदम यांच्याकडे खेड पालिका व दापोली नगरपंयायतीच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. सूर्यकांत दळवी यांची नाराजी दूर करण्यात सध्यातरी रामदास कदम यशस्वी झाले आहेत. तसेच खेडसह दापोली शहरातील व तालुक्यातील सेनेतील नाराजांना त्यांनी पुन्हा भावनिक आवाहन करीत शिवसेनेत सक्रिय केले आहे. सध्या योगेश कदम यांच्या युवासेनेचाही विविध क्षेत्रात बोलबाला आहे. आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला नामोहरम करीत चारीमुंड्या चित करण्याची योजना आमदार संजय कदम व उद्योजक सदानंद चव्हाण यांनी आखली आहे. यासाठी अटीतटीची लढत देऊ शकतील, असे तगडे उमेदवार आघाडीने उभे केले आहेत. थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वैभव खेडेकर यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न उमेदवाराला त्यांनी मतदारांसमोर पाठवले आहे. त्याचा आघाडीला कितपत फायदा होईल, हे निवडणूक निकालानंतर पाहावे लागेल. आमदार संजय कदम यांनी काही जाहीर प्रचारसभांदरम्यान रामदास कदमांवर थेट आरोप केले होेते. रामदास कदम यांनीही या आरोपांचा जाहीर सभांमध्ये खरपूस समाचार घेतला होता. या सभांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील जनतेसमोर आणि विशेषत: मतदारांमध्ये अनेक प्रश्नचिन्हदेखील उपस्थित झाली आहेत. मात्र, या गोष्टीला आता सहा महिने उलटून गेले आहेत. शहरविकास आघाडीकडून उद्योजक सदानंद कदम यांनी निवडणुकीत सहभाग घेतल्याने आघाडी मजबूत झाल्याचे दिसते. त्यामुळे शिवसेना विरुध्द आघाडी अशीच अटीतटीची लढत पाहावयास मिळणार आहे. रामदास कदम यांचा आजवरचा राजकीय अनुभव व विकासकामांचा रचलेला डोंगर आणि शिवसेना, युवासेना व महिला आघाडीतील कार्यकर्त्यांची मोठी फळी लक्षात घेता पालिका निवडणुकीत शिवसेनेला भरीव यश मिळू शकते. तर शहर विकास आघाडीने सेनेसमोर आव्हान उभे केले असून, आमदार संजय कदम यांची रणनिती, उद्योजक सदानंद कदम यांची ताकद आणि वैभव खेडेकर यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेत आघाडीला शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी) खेड पालिका निवडणुकीत शिवसेनेने १७, भाजपने १७, शहर विकास आघाडीने १७ आणि काँग्रेसने ६ तर आरपीआयने एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. या अगोदर पालिका निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे होते आणि आताच्या निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. खेड पालिका निवडणुकीसाठी शिवसेना सध्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मित्रपक्ष भाजपने आपली स्वतंत्र चूल मांडली असून, काँग्रेस व आरपीआय या दोन्ही पक्षांना शिवसेनेने जवळ न केल्याने ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. २०११च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला निसटता पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत मनसेचे ९ तर शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. रामदास कदम यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेला हे यश प्राप्त झाले होते. त्यावेळी रामदास कदम यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला असता तर पालिकेत शिवसेनेला बहुमत प्राप्त होऊन सत्तादेखील स्थापन करता आली असती, अशी सेना कार्यकर्त्यांची धारणा आहे.