रत्नागिरीत उद्यापासून राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

By मेहरून नाकाडे | Updated: June 9, 2023 17:51 IST2023-06-09T17:51:42+5:302023-06-09T17:51:56+5:30

मुंबई, पुणे, सांगली, नाशिक येथील २५ ते ३० संघ या स्पर्धेत सहभागी होणार

State level bridge competition from tomorrow in Ratnagiri | रत्नागिरीत उद्यापासून राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

रत्नागिरीत उद्यापासून राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

रत्नागिरी : इंडियन आॅईल व रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसियशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार (दि.१०) व रविवार (११) रोजी राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख अभय लेले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी इंडियन आॅईलचे मुख्य व्यवस्थापक सुरेश अय्यर, अधिकारी एस.किशोर, रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसियशनचे अध्यक्ष उमाकांत सनगर उपस्थित होते.

शनिवार दि. १० रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन इंडियन आॅईलचे मुख्य व्यवस्थापक सुरेश अय्यर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे संचालक म्हणून अविनाश चितळे (पुणे) उपस्थित राहणार आहेत. शनिवारी डुप्लीकेट स्पर्धेचे आठ राऊंड होणार आहेत. त्यातील गुणाक्रमे पहिले ६ संघ सुपर लिगसाठी पात्र होणार आहेत. त्यानंतर ओपन पेअर्स हा स्पर्धा प्रकार घेण्यात येणार आहे.

मुंबई, पुणे, सांगली, नाशिक येथील २५ ते ३० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेतचे सर्व खेळाडू परिश्रम घेत आहेत. तरी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उमाकांत सनगर यांनी यावेळी केले.

Web Title: State level bridge competition from tomorrow in Ratnagiri