शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सेतू कार्यालयात दलालांचे राज्य...

By admin | Updated: June 13, 2014 01:34 IST

सामान्यांची परवड : निव्वळ दाखल्यांवर हजारोंची कमाई

रत्नागिरी : येथील तहसिल कार्यालयात विविध दाखल्यांसाठी सध्या वाढती गर्दी आहे. मात्र, या कार्यालय परिसरात कार्यरत असलेले दलाल हजारो रूपये उकळून आपली चांदी करून घेत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांचा लगाम नसलेल्या या दलालांना सध्या चांगलेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांच्या सह्या व्हायच्या आहेत, असे सांगितले जात असतानाच या दलालांकडून हजारो रूपये पैसे देऊन काम करून घेणाऱ्यांना सह्या कशा लगेच मिळतात, असा सवाल होत आहे. सध्या येथील सेतू कार्यालयात विविध परीक्षा आणि भरती यासाठी लागणारे विविध दाखले तसेच शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी दर दिवशी गर्दी होत आहे. यासाठी अनेकांनी दोन महिन्यापूर्वी या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, अधिकारी वर्गाची सही व्हायचीय, या कारणावरून बऱ्याचजणांचे दाखले या कार्यालयाकडे रखडलेले आहेत. काही वेळा अधिकारीच दौऱ्यावर आहेत, असे सांगून या लोकांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जात आहे. मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी सेतू कार्यालयाला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी या कार्यालयाच्या समस्या समजून घेतानाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नागरिकांच्या दाखल्यांचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सेतू कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने चालला आहे. सेतूत सध्या आठ ते नऊ दलाल कार्यरत आहेत. ठराविक धनवान लोकांकडून त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे उत्त्पन्न मिळत आहे. त्यामुळे या दलालांचा हाच व्यवसाय झाला आहे. त्यांना काही शासकीय अधिकाऱ्यांचाही वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. सामान्य माणसाला अधिकारी दौऱ्यावर गेलेत, असे सांगितले जात असून त्यांच्या सहीसाठी हजारो दाखले रखडवून ठेवले जात आहेत. मात्र, काही ठराविक लोकांनाच दलालांबरोबरच काही शासकीय अधिकारीच सह्या मिळवून देत आहेत. त्यामुळे दौऱ्यांवर असलेले अधिकारी लगेचच कसे काय अवर्तीण होतात, असा सवालही केला जात आहे. सध्या सेतू कार्यालयात सामान्य माणसाची रखडपट्टी होत आहे. (प्रतिनिधी)