‘सेतू’च्या धर्तीवर कार्यालय सुरू करणार : दीपक घाेसाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:07+5:302021-03-24T04:29:07+5:30
फोटो ओळी - दीपक घोसाळकर यांचा निवडीबद्दल राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण, मुझ्झफर मुकादम, फौरोज उकये यांनी त्यांचा सत्कार केला. ...

‘सेतू’च्या धर्तीवर कार्यालय सुरू करणार : दीपक घाेसाळकर
फोटो ओळी - दीपक घोसाळकर यांचा निवडीबद्दल राष्ट्रवादीचे प्रकाश शिगवण, मुझ्झफर मुकादम, फौरोज उकये यांनी त्यांचा सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : या निवडीमुळे जबाबदारी वाढली असून, सेतू समितीचे काम अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी तहसील सेतू कार्यालयाच्या धर्तीवर कार्यालय सुरू करून येणाऱ्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन दीपक घाेसाळकर यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्हा सेतू समितीच्या निमंत्रित सदस्यपदी रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दीपक घोसाळकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंडणगड शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बाेलत हाेते.
या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभास राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस प्रकाश शिगवण, जिल्हा उपाध्यक्ष फौरोज उकये, तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, शहराध्यक्ष वैभव कोकाटे, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, माजी तालुकाध्यक्ष अनिल रटाटे, सुभाष सापटे, राकेश साळुंखे, राजा लेंढे, बशीर मसूरकर, हसरत खोपटकर, सर्फराज चिपोळकर, शंकर खेराडे, दीनकर हुंबरे, भाई मालुगुंडकर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रकाश शिगवण म्हणाले की, दीपक घोसाळकर यांची निमंत्रित सदस्यपदी निवड करून शासनाने तालुकावासीयांची मोठी गैरसोय दूर केली आहे. निवडीमुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे विविध परवाने मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. याचबरोबर सामान्य व्यापारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम, राकेश साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.