चिपळुणातील ग्रामीण भागात एस़ टी़ सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:09+5:302021-05-25T04:36:09+5:30
चिपळूण : गेले काही महिने लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात ठप्प असलेली एस़ टी़ बस सेवा पुन्हा सक्रिय होत आहे. ...

चिपळुणातील ग्रामीण भागात एस़ टी़ सेवा सुरू
चिपळूण : गेले काही महिने लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात ठप्प असलेली एस़ टी़ बस सेवा पुन्हा सक्रिय होत आहे. सोमवारपासून तालुक्यातील ग्रामीण भागात ही सेवा काही गावांमध्ये सुरू केली. शिवाय एस़ टी़ बस फेऱ्यांच्या संख्येतही वाढ केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे एस़ टी़ सेवाही बंद पडली. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. रत्नागिरी, खेड, गुहागर या ठरावीक मार्गावरच एस़ टी़ बस सेवा सुरू होती. तालुक्यातील ग्रामीण भागात एकही एस़ टी़ बस सोडली जात नव्हती. प्रथम तालुका अंतर्गत फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच पूर्ण क्षमतेने एस़ टी़ बस सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
येथील आगारातून खेड, पोफळी, शिरगाव, अलोरे, टेरव, करंबवणे, अनारी, रत्नागिरी, मालदोली, तिवरे, दुर्गवाडी, वहाळ, कळवंडे, आदी गावांमध्ये एस़ टी़ बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
----------------------------
लॉकडाऊनमध्ये एस़ टी़ सेवा पूर्णतः बंद होती. त्यामुळे उत्पन्न थांबले होते. आता अनलॉक सुरू झाल्यानंतरही प्रवाशांच्या कमी भरमनामुळे तोटा सहन करावा लागला. परंतु, आता बसफेऱ्यांची संख्या वाढली असल्याने येत्या काही दिवसांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल.
- रणजित राजेशिर्के, आगार व्यवस्थापक, चिपळूण.