एस.टी. फेरीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST2021-07-07T04:38:47+5:302021-07-07T04:38:47+5:30

सत्याग्रहींचा सत्कार राजापूर : येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेतर्फे कोदवली येथील रहिवासी गोपाळ रायकर यांच्या निवासस्थानी आणीबाणीतील सहभागी ...

S.T. Round demand | एस.टी. फेरीची मागणी

एस.टी. फेरीची मागणी

सत्याग्रहींचा सत्कार

राजापूर : येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेतर्फे कोदवली येथील रहिवासी गोपाळ रायकर यांच्या निवासस्थानी आणीबाणीतील सहभागी सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. दामोदर गाडगीळ, गोपाळ रायकर, दत्तात्रय रानडे, अनिरुद्ध ठाकूर, प्रकाश आमकर, विष्णू रानडे यांचा सत्कार करण्यात आला.

पुलाचे काम अर्धवट

रत्नागिरी : शहरातील गाडीतळ ते परटवणे नाका या ठिकाणी जाण्यासाठी असणारा परटवणे पूल पूर्ण कधी होणार, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने भराव टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. जुन्या पुलावरूनच अद्याप वाहने सुरू आहेत. त्यामुळे पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

वाहनतळाची मागणी

रत्नागिरी : शहरात जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात व रस्त्यावर रुग्णवाहिकांची गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी वाहनतळ उभारण्याची मागणी केली जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना सातत्याने ये-जा करावी लागते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

पत्रे बदलण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथे उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचे पत्रे निखळले असून ते वाऱ्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्जन्यवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पत्रे पडून दुर्घटना होऊ शकते. हे टाळण्यासाठी पत्रे नवीन घालावेत किंवा दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: S.T. Round demand