रत्नागिरी : शहरानजीकच्या बाणखिंड येथे एसटीची डंपरला धडक झाली. या अपघातात एसटी बसमधील ५ प्रवासी जखमी झाले आहेत. गणपतीपुळे-गडहिंग्लज एसटी बसची रिक्षाला ओव्हरटेक करताना समोरुन येणार्या डंपरला जोराची धडक झाली.हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडला. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शहर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या अपघात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
रत्नागिरीत एसटीची डंपरला धडक, पाच प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:19 IST