रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा
By मेहरून नाकाडे | Updated: June 1, 2024 19:23 IST2024-06-01T19:21:36+5:302024-06-01T19:23:25+5:30
एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले

रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील आगारात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ प्रवासी रामचंद्र विठ्ठल मोगरे (८५, रा. खरवते, चिपळूण) यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. तसेच रमेश मोहन पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले. रहाटाघर स्थानकात असलेल्या सर्व प्रवाशांना केक, पेढे व गुलाबपुष्प देण्यात आले. रहाटाघर बसस्थानकात वर्धापनदिनानिमित्त खास पताका लावून सुशोभीकरण करून रांगोळी काढण्यात आली होती.
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, स्थानकप्रमुख, विभागीय कार्यालय व रत्नागिरी आगारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.